?मेष-नवीन वर्षाच्या प्रथम सप्ताह विविध शुभ घटनांनी आनंद मिळवून देईल.जुनी येणी वसूल होतील.मागे अर्धवट राहिलेली कामे या सप्ताहात पूर्ण होतील.मानसन्मान प्रतिष्ठा मिळेल.प्रॉपर्टी खरेदीचे योग येतील.महिलांना गृह सौख्य लाभेल.विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतील.
?वृषभ-या सप्ताहात आपणाला गुप्त शत्रूचा त्रास होईल.जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.वर्षाची सुरुवात मध्यम राहील.एखादी नवीन वस्तू खरेदी कराल. कुटुंबात काही गोष्टी वरून वादाचे प्रसंग निर्माण होतील.आपण संयमाने राहावे .व्यापारी वर्गाला काळ चांगला असेल.पण पैसा जपून खर्च करावा.
?मिथुन- हा सप्ताह नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्यात नवीन आशा निर्माण करेल आणि त्यात आपण यशस्वी व्हाल.हा काळ आपणास यश मिळवून देणारा राहील.नोकरीच्या शोधात असाल तर नोकरीचे योग येतील.घरात पाहुण्यांचे आगमन होईल.मुलांना सहलीचा आनंद घेता येईल.व्यापाऱ्यांनी याकाळात आर्थिक स्थिती चांगली राहील परंतु आपण या काळात नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर भागीदारी न करता संयुक्त पणे व्यवसाय केल्यास उत्तम.
?कर्क-या काळात आपण आनंदी असाल कारण आपल्या मनासारख्या गोष्टी होत असल्याने मन प्रसन्न राहील.कुटूंबासाठी पैसे खर्च कराल. पण आपण खर्च करताना जपून करावा.धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.महिलांना प्रकुर्तीची काळजी घ्यावी.
?सिंह-नवीन वर्षाची सुरवात चांगली राहील.घरात एखादे मंगलकार्य होईल किंवा त्यासंबंधी बोलणी होतील. नोकरी व व्यापारी लोकांना हा सप्ताह यश देणारा असेल.आपल्याला आपल्या जोडीदाराचे सहकार्य लाभेल.आपल्याला सामाजिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल
?कन्या-या सप्ताहात आपल्याला अचानक एखादी चांगली बातमी मिळेल. या मुळे मन प्रसन्न राहील.याकाळात आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावि लागेल.याकाळात प्रॉपर्टी संदर्भातील व्यवहार न केलेले उत्तम राहील. कोर्ट संबंधित कामे रेंगाळतील.काही कामासाठी प्रवास करावा लागेल.आता केलेल्या कामाचे फल पुढिल सप्ताहात मिळेल
?तुळ-या नवीन वर्षाची सुरुवात आपणाला सुख दायी राहील. कामाचा उरक वाढेल.विवाहयोग्य तरुणतरुणीचे विवाह जमण्याचे योग येतील.व्यावसाईक नोकर वर्गात काही आर्थिक फायदे होतील.पण वयस्कर मंडळींनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावि. महिलांनी आपल्यामुळे घरात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी.विद्यार्थी वर्गाला काही नवीन शिकण्याची संधी मिळेल.
?वृश्चिक-हा सप्ताह आपणास मध्यम राहील. नवीन वर्षाची सुरवात करताना कामाचे नियोजन केले तर फायद्याचे राहील विनाकारण चिडचिड करू नका त्यामुळे घरातील वातावरण खराब होईल.नोकरीत असणाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संयमाने वागावे.महिलांना या काळात नवीन दागिने खरेदीचे योग येतील.मुलांना सहलीचा आनंद घेता येईल.उष्णतेचे विकार होतील.
?धनु-नवीन वर्ष आपणास काही तरी नवीन गोष्टी शिकण्याची संधी देईल. हा काळ आपणास उत्तम राहील संतती संबंधित काही चांगल्या बातम्या मिळतील.मित्रांचे सहकार्य लाभेल.कुटुंबाबरोबर प्रवासाचे योग येतील.या काळात घरातील वरिष्ठ लोकांच्या प्रकुर्ती संबंधित तक्रारी वाढतील.खर्चाचे प्रमाण या काळात वाढेल.या काळात नको तो खर्च टाळावा.
?मकर-या काळात आपल्या मना प्रमाणे कामे होतील त्यामुळे मन प्रसन्न राहील. पण कामाचा ताण वाढल्यामुळे तब्येतिच्या तक्रारी वाढतील.या काळात कुटूंबात काही समस्या निर्माण होतील पण त्या आपण योग्य रित्या हाताळले तर आपणास त्रास होणार नाही.कला तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांना काळ उत्तम राहील व्यापारी वर्गाला काही अनेपक्षित लाभ होतील.
?कुंभ-या सप्ताहात आपणास काही विचित्र अनुभव येतील.आपल्या एखाद्या जवळील व्यक्ती संबंधी चिंता निर्माण होईल.कोर्टकचेरीच्या कामात अडथळा निर्माण होईल. पैशाची आवक राहील परंतु खर्चही त्या प्रमाणात होईल.वाहन खरेदीचे योग येतील.लोखंड व्यवसायात असणाऱ्याना लाभदायी सप्ताह राहील.नोकरीत असणाऱ्याना बढतिचे योग येतील.
?मीन-हा सप्ताह नाविन्यपूर्ण घटनांचा राहील काही अनपेक्षित गोष्टी घडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील.विवाहिताना संतती प्राप्तीचे योग येतील.महिलांना कुटूंब सौख्य लाभेल.तरुण मुलामुलींनी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. व्यावसाईक वर्गाला आर्थिक नुकसान होण्याचा संभव आहे त्यामुळे कुणाला उधार उसने देऊ नये.वयस्कर मंडळींनी प्रकृतीची काळजी घ्यावी.नवीनवर्ष आपणास काही नवीन करण्याची संधी देईल.
*जोतिष*
*उषा सुभेदार*
कोरे गल्ली,शहापूर
बेळगाव
8762655792