उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकस्कोप जलाशयातील पाणीसाठा टिकून असला तरी वाढत्या उष्म्याने पाणी आटण्याचा धोका नाकारता येत नाही. अशावेळी पाणी वापरताना काळजी घेण्याची जबाबदारी नागरिकांनी पाळतानाच कुठेही गळत्या होऊन पाणी वाया जाऊ नये हे पाणी पुरवठा विभागाने पाहावे लागेल.
राकस्कोप जलाशयाची क्षमता ०.५ टीएमसी इतकी आहे. सध्या या जलाशयात २४६२.५४ फूट पाणीसाठा आहे. हिडकल धरण जलाशयाची क्षमता ५१ टीएमसी इतकी असून त्यात सध्या ११ टीएमसी इतकेच पाणी शिल्लक आहे, त्यापैकी २ टीएमसी बेळगाव शहरकरिता राखीव ठेवण्यात आले आहे, म्हणून आता पाणी वाया घालवून चालणार नाही अन्यथा मे महिन्यात समस्या गंभीर होण्याचा धोका नाकारता येत नाही.
बेळगाव शहरातील ५८ वॉर्डांची भिस्त या पाण्यावर आहे. त्यापैकी ४८ वॉर्डांना १ दिवसाआड तर उर्वरित १० वॉर्डांना २४ तास पाणी दिले जाते, ज्याठिकाणी २४ तास पाणी आहे तेथील लोकांनी आवश्यक तेवढाच वापर केला तर बाकीच्या ठिकाणी पाणी मिळू शकेल नाहीतर सर्वांनाच मे च्या उकाड्यात पाणी पाणी म्हणून फिरावे लागेल.
Trending Now