पोलीस आयुक्तालय झाले आणि बेळगावला आयपीएस अधिकाऱ्यांची भर पडली. खाते अधिक जबाबदार आणि सक्षम होण्याकडे वाटचाल करत आहे. यापूर्वी कुठेही संशयास्पद वस्तू दिसली की बाहेरून तज्ञांना बोलवावे लागत होते, पण आता बेळगाव पोलिसच करू शकतील संशयास्पद वस्तूचा पर्दाफाश आणि बॉम्ब सारख्या वस्तू निकामी करू शकतील.
यासाठी पोलिसांना मुंबई इथून खास तज्ज्ञ मागवून प्रशिक्षण दिले जात आहे.
लष्करात अधिकारी म्हणून काम केलेल्या दीपक राव आणि सीमा राव या प्रसिद्ध स्फोटक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे. आज दिवसभर हे प्रशिक्षण सुरू असून पोलिसांनी त्यात भाग घेतला होता