नानावाडी जवळच्या आश्रयवाडीला २००४ पासून पिण्याचे पाणी व इतर पायाभूत सवलती मिळाल्याच नाहीत, कायम मागणी करूनही पदरी दुर्लक्षच आले, यामुळे या भागातील ४० कुटुंबांनी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतः समुदायिकपणे खर्च केला आहे.
स्वतः ३.९८ लाख रुपये जमा करून ते के यु डब्ल्यू एस कडे जमा करण्यात आले आहेत. सोया पाहिजे असेल आणि पैसे भरण्याची तयारी असेल तर कामे पटापट होतात हा अनुभव या लोकांना आला आहे. आता पाईपलाईन घालून काही महिन्यात पाणी देण्याचे आश्वासन या लोकांना मिळाले आहे.