एक रुपये प्रति किलो कॅबिज दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे कॅबिज सरकारने खरेदी करून योग्य हमी भाव ध्यावा या मागणी साठी रयत संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी कॅबिज सह जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केलं.
कडोली येथील शेतकरी नेते अपासाहेब देसाई यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कॅबिजची पोती डी सी ऑफिस समोर ठेवत ठिय्या आंदोलन छेडलं.गेल्या महिन्या भरात कॅबिज डोकीवर घेऊन डी सी कार्यालया समोर आंदोलन करायची ही दुसरी वेळ आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घोषित करून कॅबिज शासनाने खरेदी करा अन्यथा शेतकऱ्यां समोर आत्महत्या हाच पर्याय आहे असा इशारा देसाई यांनी दिला आहे.यावेळी कडोली भागातील शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.