हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने कोल्हापूरचा पैलवान भारत केसरी माऊली जमदाडे याने भारत केसरी हरियाणाच्या पैलवान सोनू याचा 15 व्या मिनिटाला एकेरी कस लावत विजय मिळवला अन बेळगाव आनंदवाडी आखाडा दंगलीची बाजी मारत लोकमान्य बेळगाव केसरी हा किताब पटकावला.
तर दुसऱ्या नंबरच्या कुस्तीत कार्तिक काटे कर्नाटक केसरी आणि कुलदीप हरियाणा यांच्यात बरोबरीने सोडवण्यात आली.आनंद वाडीच्या आखाड्यात हजारो कुस्ती प्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती 40 हुन अधिक लहान मोठया चटकदार कुस्त्यांचे बेळगाव कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात करण्यात आले होते.
कुस्ती मैदानात जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने उदयोन्मुख कुस्ती खेळाडू असलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला.