११० मीटर उंच स्थंभावर १२० फूट लांब आणि ८० फूट रुंदीचा तिरंगा बेळगावात फडकणार आहे. सोमवारी ११ रोजी किल्ला तलावाच्या परिसरात हा ध्वज फडकवण्यात येणार आहे. भारतातील सर्वात उंच स्थंभावरील तिरंगा असा विक्रम हा ध्वज करणार आहे.
हा ध्वज ऐतिहासिक असेल त्यामुळे तो पोलीस्टर पासून बनवण्यात आला आहे. हवामानाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होऊ शकणार नाही.
हा ध्वज कायम फडकत राहणार असून त्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी घेण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी रोषणाई असणार आहे.
आमदार फिरोज शेठ यांनी हे एक बेळगाव वासीयांचे स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.