Saturday, November 9, 2024

/

पवार सभा संपर्क कार्यालयाचे उदघाटन

 belgaum

रंगुबाई पॅलेस मधील शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या  कार्यालयात खासदार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सभा आयोजन मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केलं.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची समिती साठीची बेळगावात 31 रोजी होणारी सभा शेवटची सभा ठरो यापुढे बेळगाव महाराष्ट्रातच सामील झाल्यावर सभा व्हावी असं मत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी व्यक्त केले.

Mes

मराठा क्रांती मोर्चात जसे सर्व मराठे घरा बाहेर पडले होते त्याच धर्तीवर शहर तालुक्यातील सर्व महिला मंडळांनी एक  मराठा लाख  मराठा धर्तीवर सभेत सामील व्हा अस आवाहन देखील सरस्वती पाटील यांनी केलं.यावेळी मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील,प्रकाश मरगाळे, सरिता पाटील, मनोहर किणेकर आदींनी सभा यशस्वी करण्याबद्दल आपले विचार मांडले.
यावेळी सभेसाठी विविध कामा साठी कमिटया नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. सभेचे ठिकाणी ज्योती कॉलेज मैदान करण्यासाठी प्रयत्न सुरू असून तेच मैदान कार्यक्रमा साठी घेण्याचा प्रयत्न करू यावर देखील चर्चा झाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.