आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी बेळगावच्या महिलांसाठी खुशीची बातमी आहे. महिलांनी घरच्या घरी बनवलेल्या उत्पादनांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाव मिळणार आहे.
यासाठी कृषिशास्त्र विद्यापीठाने वेदा या संस्थेशी समन्वय करार केला आहे. कुलगुरू बी एस जाणगौडर यांनी यात पुढाकार घेतला आहे. वेदा चे पूर्ण नाव वूमन आंतरप्रिनेर डेवलपमेंट असोशिएशन आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी काम करते.
या करारा द्वारे महिलांना नवे तंत्रज्ञान आणि मार्केटिंग चे ज्ञान शिकवण्यात येणार आहे. कच्चा माल कुठे घ्यावा, तयार माल कुठे विकावा याचे ज्ञान दिले जाणार आहे. हे शिक्षण देताना दरमहा ५५०० मानधनही दिले जाणार आहे.
हा करार ५ वर्षासाठी असून ५००० महिलांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. एक गाव एक उत्पादन या नावाखाली हा उपक्रम चालणार आहे. रथी श्रीनिवासन, वैशाली मनोज उपाध्ये, रूपा प्रमोद देसाई, श्रुती सुभाष वेरणेकर व सुचेता इनामदार ही टीम यावर प्रमुख जबाबदारी निभावणार आहे.