वारंवार पातळ शौचाला होणे अर्थात अतिसार हा सर्वांनाच व कधीही होणारा विकार आहे. यामध्ये अक्यूट अर्थात ठराविक कालावधीचा अतिसार व क्रॉनिक अर्थात जुनाट अतिसाराचा विकार असे प्रकार आहेत. भारतामध्ये विशेषतः मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण खूप आहे. काही वेळा अतिसाराचे स्वरूप बरेच तीव्र असते किंवा बरेच दिवस हे चालू असते.
कारणे व लक्षणे-
आपल्या शरीरातील लहान आतड्यात दिवसभरात पाच ते आठ लिटरपेक्षा जास्त पाणी आणि द्रवपदार्थ जात असतात. जेवणातून तसेच जठर, यकृत, स्वादुग्रंथी आणि लहान व मोठ्या आतड्यातून पाझरणारे पाचकरस यांचा समावेश असतो. जुलाब व्हायला सुरूवात होते याचाच अर्थ पोटातील पाण्याचे शोषण झालेले नसते व ते जास्त झालेले पाणी पोटात राहते. हे जास्तीचे पाणी स्थूल आंत्राशयात पाठवले जाते. लहान आतडे व मोठे आतडे यांना जोडणारा भाग म्हणजे स्थूल आंत्राशय. याची पाणी शोषून घ्यायची क्षमता संपली की जुलाब सुरू होतात.
अति खाण्यामुळे किंवा शरीराला अपायकारक होणारे पदार्थ खाल्ल्यामुळे जुलाब होतात. तसेच आतड्याच्या मार्गात अन्न कुजणे, कर्बोदकांचे अर्धवट पचन होणे व ती आंबणे, औदासिन्य, प्रतिजैविकासासरख्या (अँटीबोयोटिक्स) औषणांमुळे, पोट साफ होण्यासाठी अतिरिक्त्त रेचक घेतल्यामुळे, जास्त मेदपदार्थ आतड्यात आल्यामुळेसुध्दा जुलाब होतात. त्याशिवाय उपोषण, कुपोषण यामुळे तसेच अन्नातून, हवेतून, पाण्यातून, होणार्या जंतू- विषाणू जिवाणू तसेच विष4जन्य पदार्थ यामुळे अतिसार होऊ शकतो. विशिष्ट पदार्थाची एखाद्या व्यक्तीला अलर्जी असण्यामुळेही (उदा. दूध, गहू, अंडी, सागरी, अन्नपदार्थ (सी फूड) जुलाब होण्याचा विकार जडतो. भावनिक संघर्ष, मानसिक ताणतणाव आणि लहान मुलांच्या मनामध्ये भय यामुळेही अन्न पचन व्यवस्थित न होता जुलाब सुरू होतात. थॉयराईड ग्रंथीचे कार्य प्रमाणापेक्षा वाढणे (हायपरथॉयराईड) मधूमेह, आतड्यांचा क्षयरोग, काही चर्मरोग यांच्यामुळेही अतिसाराचा त्रास होऊ शकतो.
उपचार- निसर्गोपचार- जुलाब कमी करण्यासाठी ताकात किंचित मीठ टाकून प्याल्याने आतड्यातील हानीकारक जंतूंचा प्रादुर्भाव कमी होतो. गाजराचे सूपही अतिशय उपयुक्त्त आहे. जंतूची वाढ तर कमी होतेच शिवाय सर्व क्षार व पेक्टिन गाजरात असतात. त्यामुळे पेक्टिनचा थर आतड्यांच्या पेशीवर बसल्याने आतड्याचा दाह थांबून जुलाब तसेच उलट्यासुध्दा थांबतात. लहान मुलांना उकडे तांदूळ भाजून त्याचे पीठ ताकात मिसळून अर्ध्या अर्ध्या तासाने द्यावे. आरारूटचे पाणी, बार्लीचे पाणी किंवा, शहाळ्याचे पाणी दिल्याने शरीरातील क्षार व पाण्याची कमतरता भरून निघते व तेवढा अशक्त्तपणा वाटत नाही. डाळिंबाचा रस, उकडलेले सफरचंद यांचाही जुलाब होत असल्यास उपयोग होतो.
बाराक्षार- नॅट्रमफॉस 3, कॅलकेरिया फॉस 3, फेरमफॉस3, काली फॉस3, काली सल्फ3, नॅट्रम सल्फ 3 ही औषधे समप्रमाणात घेऊन हे मिश्रण अतिसारावर तयार करावे. हे मिश्रण उपयुक्त आहे. कोणत्याही प्रकारचा अतिसार यामुळे नियंत्रणात येतो. परंतु डोस मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा.
होमिओपॅथी- अतिसाराची कारणे पाहून, लक्षणे पडताळून व व्यक्ती वैशिष्ट्यानुसार होमिओपॅथिक औषध दिल्यास दुसर्या कोणत्याच उपचारांची गरज पडत नाही. होमिओपॅथीने अगदी साध्या जुलाबापासून मोठ्या आतड्याच्या कॅन्सनपर्यंत सर्वतोपरी उपचार करता येतात. काही उदाहरणांचे दाखले दिले जातात. त्यावरून फक्त एखादेच औषध वाचून उपचार घेणे चुकीचे ठरते. अक्यूट डायरिया तसेच क्रॉनिक डायरिया दोन्ही अतिशय पोटात दुखून जुलाब होतात. पोट दाबल्यास बरे वाटते, वाकून पोट दाबले गेल्यास बरे वाटते. अतिरागामुळे पोट झाडते अशा वैशिष्ट्यावर कोलोसिंथ नावाचे औषध आहे. शौचावर नियंत्रण राहत नाही नुसता गॅस बाहेर पडला तरी शौच होते. उठण्याचाही कालावधी मिळत नाही. यावर अॅलो- सोकोट्रिना नावाचे औषध उपयोगी ठरते.
संपर्क
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक – ९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८