थकित ऊस बिल त्वरित अदा करा,ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करा शेती मालाला योग्य तो हमी भाव द्या अशा वेगवेगळ्या अनेक मागण्याचे निवेदन घेउन तालुका महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमचा हक्क आम्हाला द्या , द्या द्या आम्हाला न्याय द्या, शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा अनेक घोषणानी हा संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय या सरकारने ठेवलेला नाही एकीकडे उद्योगपती ना कर्ज उपलब्ध होते त्यांच्या सर्व व्यवसायाला सुविधा दिल्या जातात मात्र मात्र शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केला . वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्तता केली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला .त्यावेळी तालुक्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, एस एल चौगुले ए पी एम सी चे सदस्य तानाजी पाटील , रामचंद्र मोदगेकर आदी उपस्थित होते.