Saturday, April 27, 2024

/

भांडी साडी नको मराठीचा हक्क द्या- रांगोळीद्वारे युवकाचा मराठी बाणा

 belgaum

बेळगाव ग्रामीण च्या काँग्रेस पक्षाच्या इच्छुक महिला उमेदवार बुधवारी किणये, कर्ले, जानेवाडी या भागात रांगोळी स्पर्धेच्या आड भांडी, कुकर देण्यासाठी येणार होत्या .पण त्या साहित्याचा स्टॉक संपल्याने सदर इच्छुक महिला त्या भागात आली नाही. त्यामुळे या गावांमधील रांगोळी काढलेल्या बऱ्याच महिलांचा हिरमोड झाला.
कर्ले गावातील एक कट्टर मराठी प्रेमी युवकाने आपल्या गल्लीत’आम्हाला साडी भांडी नको आम्हाला मराठी भाषेचा हक्क द्या’ असे खणखणीत लिहून आपला मराठी बाणा दाखवत मत विकत घेण्याची आमिष देणाऱ्याचा निषेध व्यक्त केला आहे.

karle marathi rangoli
मराठी परिपत्रके द्या अशी रांगोळीतून मागणी केलेला कट्टर मराठी प्रेमी युवक बेळगाव live च्या व्हाट्स अप ग्रुप चा सदस्य आहे.दारू मटण भांड्यांना आपल मत विकू नका ते अनमोल आहे मत विकणे म्हणजे आपला स्वाभिमान विकल्या सारखा आहे असं आवाहन समििती   नेेेेत्यानी  केलं होतं त्या आवाहनास या कट्टर मराठी युवकाने प्रतिसाद दिला आहे.
मतासाठी आमिष दाखवुन मते खरेदी करणाऱ्या बेगडी मराठी प्रेम दाखवणाऱ्याना अश्या युवकांनी रांगोळीतून का होईना अस्मिता तर दाखवलेच या शिवाय कुकर साड्या साठी लाचार होऊ नका मातृ भाषा जगवा असा संदेश देखील दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.