पत्रकार विकास अकादमीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या कै. बाबुराव ठाकूर स्मृती पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नेहरू नगर येथील पत्रकार अकादमीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.अकादमीचे सचिव प्रसाद प्रभू विश्वस्त प्रशांत बर्डे यांनी यांनी ही घोषणा केली.
विशेष गौरव पुरस्कार मंगसुळी चे दैनिक पुढारी चे वार्ताहर शिवाजी पाटील, युवा पत्रकार पुरस्कार दैनिक तरुण भारतच्या अस्मिता कंग्राळकर, उत्कृष्ट छाया चित्रकार म्हणून पी के बडीगेर(माहिती वार्ता खाते) तर इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागात सुभानी मुल्ला इन बेलगाम यांना जाहीर करण्यात आले आहेत.
आगामी 11 मार्च रोजी विकास अकादमीच्या 20 व्या वर्धापन दिनी स्कुल ऑफ कल्चर शेजारी शंभू दत्त मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत. खासदार राजू शेट्टी,झी मिडिया चे संपादक विजय कुवळेकर आणि कोल्हापूर माहिती खात्याचे अधिकारी सतीश लळीत यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.रोख रक्कम प्रशस्तीपत्र आणि मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी विशेष योगदान दिल्या बद्दल तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांचा सत्कार देखील केला जाणार आहे.