बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशन तर्फे बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांची भेट घेऊन वाराणसी आणि दिल्ली साठी बेलगावहून खास विमानाची मागणी करण्यात आली आहे.
बेळगावच्या कापड उत्पादक आणि व्यावसायिकांना उत्तर भारत आणि महत्वाच्या शहरांना जाता यावे यासाठी ही सोय देण्याची विनंती करण्यात आली.
साडी व्यवसायाला चांगला यांनीयोग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. विमान सेवा सुुरु प्रयत्न करण्याचे आश्वासन मौर्य यांनी दिले.
शहापूर साडी बेळगावात येणाऱ्या पर्यटकांना पाहता यावेत यासाठी विमान तळावर आगमन आणि प्रस्थान वर स्टॉल लावू असं देखील मौर्य म्हणाले.अध्यक्ष हॅमेंड पोरवाल, उपाध्यक्ष सतीश तेंडुलकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.