सध्या रहदारी पोलिसांना फोटोग्राफर ची नवीन भूमिका सांभाळावी लागत आहे. रहदारीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांच्या नंबर प्लेट चा फोटो काढून घेण्याचे काम त्यांना लागत आहे.
सध्या हेल्मेटची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. यामुळे ट्रॅफीक सिग्नल वर रहदारी पोलीस चटकन आपले मोबाईल काढून फोटो घेण्याच्या पवित्र्यात दिसत आहेत.
हे फोटो कंट्रोल रूम कडे पाठवले की नंबर स्ट्रेस करून गाडी मालकाला नियम मोडल्याबद्दल लागलीच नोटीस पाठवली जाते. यामुळे वाहनचालकांनी त्यांची धास्ती घेतली आहे.