बेळगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काल राविवारीपेक्षा आज सोमवारी तापमानात दोन अंशाने वाढ झाली आहे.
रविवारी बेळगाव शहरात ३४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. आजचे तापमान ३६ अंश इतके झाले असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.
मार्च महिना सुरू झाला तसे तापमान वाढत चालले आहे. यामुळे एसी आणि फॅन शिवाय जगणे अवघड झाले आहे. होळी पौर्णिमा आली तशी उकाडा वाढत असून आईस्क्रीम व कोल्ड ड्रिंक्स ची मागणीही वाढत चालली आहे.
Trending Now