Friday, September 20, 2024

/

दीपक ओऊळकर आता गिल्ड प्रमाणित फ्रेमर

 belgaum

पिक्चर फ्रेमिंग च्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या देशातील १२ फ्रेमर्स ना गिल्ड ने प्रमाणित केले. ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे झालेल्या आय एच जी एफ च्या ४५ व्या एडिशन मध्ये केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी ही प्रमाणपत्रे दिली.

 

deepak-oulkarत्या बारा जणांपैकी एक आहेत बेळगावच्या सुभाष फोटो सिस्टिमचे दीपक आनंदराव ओऊळकर. दीपक यांनी मिळवलेले हे यश बेळगावसाठी भूषण ठरले आहे.
यासाठीच प्रशिक्षण कार्यक्रम ६ ते १२ नोव्हेबर याकाळात कोलकता येथे झाला होता. देशभरातील २० सदस्य सहभागी झाले होते. त्यापैकी १२ जण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करू शकले आहेत.
दीपक ओऊळकर यांना फोटोग्राफी मधील मोठा अनुभव आहे. टिळकवाडी येथे ते सुभाष फोटो सिस्टीम ही फर्म चालवतात. फ्रेमिंग च्या दुनियेत आता आपले फर्म अव्वल स्थानावर घेऊन जाण्यासाठी त्यांना मदत होणार आहे. दर्जात्मक फोटोग्राफी च्या बरोबरीनेच दर्जेदार फ्रेमिंग साठीही सुभाष चे नाव यापुढे घेतले जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.