येत्या १ मार्च रोजी होणाऱ्या होळी रंग पंचमी हा सण शांतेतत पार पाडावेत असे आवाहन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी केले आहे.
सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केले. यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर ,उपायुक्त महानिंग नंद्गावी यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
होळी सणा दरम्यान धुडघूस घालणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना इशारा देताना पोलीस आयुक्त राजप्पा म्हणाले की केमिकल मिश्रित रंग खेळणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, दारू पिऊन बेदरकारपणे दुचाकी व चार चाकी गाड्या चालवून शहरात गोंधळ माजवणाऱ्यांची मुळीच गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले .
होलिकोत्सवा दरम्यान शहर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून फिरती पोलीस गस्त आणि मोक्याच्या ठिकाणी बंदुकधारी पोलीस देखील तैनात करण्यात येणार आहेत अश माहिती पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिली. यावेळी सर्व धर्मियांनी शांतता कशी प्रस्थापित करता येईल यावर कटाक्षाने भर ध्यावा अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिली. यावेळी शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.