बेळगाव शहराच्या गजबजलेल्या कॉलेज रोडवर ठाणे जनता सहकारी बँक लगत लांब शेपटीचा मांजरासारखा एक वेगळाच प्राणी दिसला. नंतर ते खवल्या मांजर असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.
सुरुवातीला हा प्राणी बघून नागरिक आश्चर्यचकित झाले होते. हा प्राणी पश्चिम घाटात जंगलात आढळतो, तो बहुतेक पाणी आणि खाध्य न मिळाल्याने शहरात आल्याची शक्यता आहे. जास्तीतजास्त झाडावर राहून फळे आणि झाडाच्या साली व पाने खाऊन तो गुजराण करतो.
गौरव ओऊळकर यांना १४ तारखेला तो पहिल्यांदा दिसला होता, त्यानंतर आणखी दोन दिवसांनी दिसून आला. वनखात्याच्या अधिकाऱ्यांना कळविले असता हा प्राणी कुणावरही हल्ला करीत नाही आणि स्वतःचे स्वतः निघून जातो असे सांगितले आहे.
त्याची हत्या होऊ नये म्हणून वनसंरक्षण कायद्यांअन्वये त्याला संरक्षण आहे.
फोटो सौजन्य – ऑल अबाऊट बेलगाम