प्रत्येक शनिवारी रात्रभर धिंगाणा घालण्याचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किर्लोस्कर रोड वरील एक टॉप हॉटेलच्या नाईट क्लबवर पोलिसांनी आत्ताच रात्री उशिरा छापा मारला आहे.
स्वतः पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आणि इतर पोलीस अधिकारी याठिकाणी छाप्यात सहभागी झाले आहेत.
रात्री ११ पासूनच पोलीस या भागात फिरत होते. धर्मवीर संभाजी चौकात जमून अचानक हा छापा टाकण्यात आला असून तेथे काय कारवाई सुरू आहे हे अध्याप कळलेले नाही.