पुढील महिन्यात कर्नाटकात होणाऱ्या विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बेळगावात कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्राच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली.
शासकीय विश्राम धामात झालेल्या बैठकीस महाराष्ट्रातून कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, बेळगाव उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार,उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक चंदन चौधरी बेळगाव पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्या सह अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
निवडणूक काळात सीमावर्ती भागात होणाऱ्या गुन्हेगारी पाश्वभूमीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल आहे. यावेळी साधक बाधक चर्चा होऊन तिन्ही राज्यातील पोलिसांनी एकमेकांत विशेष सहकार्य देण्याचे ठरले.
उत्तर कर्नाटकातील पाच जिल्ह्यातील सीमेवर ३५ चेक पोस्ट बसवण्यात येणार असून तिन्ही राज्यातील होणारी अवैध वाहतूक,तस्करी,मध्य,शस्त्रास्त्रे आणि बेकायादेशी पैश्यावर करडी नजर असणार आहे अशी माहिती बेळगाव आय जी पी अलोक कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.