बेळगावचे पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी रहदारी समस्या आणि नियमभंग जाणून घेऊन कारवाई करण्यासाठी आपला नाव व्हाट्सएप कॉन्टॅक्ट जाहीर केला आहे.
९४८३९३११०० असा तो क्रमांक असून नागरिक त्यावर रहदारी संदर्भातील समस्या पाठवू शकतात. विना हेल्मेट, तिबल सीट जाणे तसेच नियमभंगाच्या गोष्टीही या क्रमांकावर पाठविता येतात. फक्त फोटो नाही तर लोकेशन आणि गाडी नंबर ही तारखेसहं पाठवणे गरजेचे आहे.
यात रिक्षावाले आणि इतर वाहन चालक रहदारीचे नियम मोडत असल्यास त्यांच्याही तक्रारी करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे.
Trending Now