रविवारी रात्री पुन्हा एकट्या युवकाने रेल्वेखाली झोकून आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मनोज नंदाजी पाटील वय 24 रा.पाटील गल्ली खादरवाडी अस आत्महत्या केलेल्या मयत युवकाचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना मजगाव चौथे गेट आणि देसुर च्या मध्ये रात्री बाराच्या दरम्यान घडली आहे.मनोज हा उध्यमबाग मध्ये कामाला जात होता रविवारी रात्री खादरवाडी येथील क्रिकेट मॅच झाल्यावर घरातून बाहेर पडला होता त्या नंतर रात्रभर घरच्यानी शोधा शोधी केली होती. आत्महत्त्येचं नेमकं कारण समजू शकल नाही रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.
आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सिटीजन कौन्सिलच्या मागणी नंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शहरातील रेल्वे लाईन च्या दोन्ही बाजूस संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू करा असा आदेश दिला आहे लवकर हे काम कधी सुरू होतंय याकडे लक्ष लागले आहे.