हिपॅटायटीस अर्थात यकृत दाह! यकृत हे मानवी शरीरातील अतिशय महत्वाचे अंग मानले जाते. यकृताची अनेक कार्ये आहेत. पचनामध्ये मदत करणे, पित्तरस तयार करणे, संसर्गजन्य रोग थोपवण्यास मदत करणे, काही विकर व हार्मोन्स तयार करणे, दूषित पदार्थ उत्सर्जित करण्यास मदत करणे, रक्तातील घटकांचा समतोल राखणे, ऊर्जा साठवणे इत्यादी तर या यकृतालाच कधीकधी इन्फेक्शन होते. त्यातील हिपॅटायटीस- बी हा विकार घातक समजला जातो.
कारणे-
हा विकार एका व्हायरस अर्थात विषाणूमुळे होतो. ज्या व्यक्तीला हा विकार झालेला आहे त्या व्यक्तीच्या रक्त, वीर्य आणि लाळेच्या संपर्कात आल्यामुळे या विषाणूची लागण होऊ शकते.
1. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे.
2. बाधित सुया टोचल्यामुळे (अंमली पदार्थ घेणार्या व्यक्तींना)
3. गोंदणे, कान व नाक टोचणे यामुळे
4. हॉस्पिटल वा दवाखान्यांमध्ये संसर्गित इंजेक्शनच्या सुया टोचल्यामुळे
5. बाधित व्यक्तीचे रेझर किंवा टूथब्रश वापरल्यामुळे.
6. संसर्गित गरोदर स्त्रीकडून बाळाकडे हा विषाणू पसरू शकतो.
परंतु संसर्गित व्यक्तीशी बोलण्यामुळे, हस्तांदोलन केल्यामुळे किंवा अशा व्यक्तिींच्या बाजूला बसल्यामुळे या रोगाची लागण होत नाही.
लक्षणे- ’फ्लू’ झाल्यासारखी लक्षणे आढळून येतात. सतत थकवा आल्यासारखा वाटतो. मळमळणे, पोटात ढवळणे, ताप येणे, अन्नावरची वासना कमी होणे, पोटात दुखणे, शौचास पातळ होणे असे प्रकार होतात. ’क्वचितच’ डोळे, त्वचा पिवळी दिसते, फिकट शौचास होते, लघवी खूप पिवळी होते. म्हणूनच कदाचित या काविळीला पांढरी कावीळ म्हटले जात असावे. काही व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत. काही व्यक्तींमध्ये सांधेदुखी प्रकर्षाने आढळते. रक्तामध्ये ऑस्ट्रेलिया अँटीजेन हा घटक आढळल्यास हिपॅटायटीस बी चे निदान अचूक करता येते. काहीवेळा लिव्हर बायोप्सी करून यकृताच्या पेशींची किती हानी झाली आहे हे ठरवण्यास सोपे जाते. जेव्हा प्रथमच हिपॅटायटिस बीची लक्षण दिसतात तेव्हा ती अक्युट स्थितीत असतात. नंतर रूग्ण हा या विकाराचा वाहक (कॅरियर) बनतो. क्रॉनिक हिपॅटायटीसमध्ये यकृताची अपरिमित हानी होते. त्यानंतर हळुहळु यकृत जाळीदार (सिरोसीस) बनत जाते. तेव्हा वजन कमी होणे, उलटी, मळमळ होणे, दिवसेंदिवस खंगत जाणे, शरीर पिवळेधमक होणे अशी लक्षणं दिसू लागतात. त्यानंतर यकृतनाश (लिव्हर फेल्युअर) किंवा लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो. याला काही दिवस किंवा काही महिनेही लागू शकतात.
पांढरी कावीळ किती घातक आहे?
जवळजवळ 60 टक्के रूग्ण पूर्ण बरे होतात. 10 टक्के लोकांना जास्त वाईट परिणाम भोगावे लागतात तर 30 टक्के लोक वाहक बनतात. काही रूग्णांना यामुळे वंध्यत्व येते.
प्रतिबंध- प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. पहिला डोस दिल्यावर एक महिन्याने दुसर्या इंजेक्शनचा डोस व नंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस दिला जातो. डॉक्टर्स, नर्सीस, वॉर्डबॉईज, लॅब टेक्निशियन्स यांना तर ही सर्वात आवश् लस आहे. बाधित व्यक्तीशी संबंध आल्यास 14 दिवसांच्या आत व बाधित मातेच्या बाळाला प्रसूतीनंतर ताबडतोब ही लस टोचावी लागते.
उपचार- मॉडर्न उपचारांमध्ये इंटरफेरॉन, लॅमीव्ह्यूडीन, अडेफोवीर डीपीव्होक्सील अशा औषधांनी हा विकार आटोक्यात आणला जातो.
होमिओपॅथी- एका मोठ्या इस्पितळात प्रयोगशाळेत मदतनीस म्हणून काम करणारा एक रूग्ण संसर्गित सुई टोचल्यामुळे तो हिपॅटायटीसचा वाहक बनला. अपघातानेच त्याला हे नंतर समजलं. इतर काही उपचारांचा उपयोग न झाल्याने होमिओपॅथीकडे वळला. त्याच्या व्यक्ती वैशिष्ट्यानुसार एक औषध दिल्यावर रक्ताचे रिपोर्ट नॉर्मल येऊ लागले. अशा कित्येक केसीस होमिओपॅथीने बर्या होतात. चेलीडोनियम, चायना, लायकोपोडियम, वेरिओलिनम अशी अनेक औषधं उपलब्ध आहेत.
बाराक्षार- फेरम फॉस 6ु कालीमूर 6ु नॅट्रम सल्फ 12ु
निसर्गोपचार- मुळ्याच्या हिरव्या पानांचा रस दोन कप रोज प्यावा. ’तूर’- तुरीच्या पानांचा रस रोज अर्धा कप प्यावा. 8 बदाम, दोन खारका व वेलदोड्यातील चारपाच दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी बदामाची साल व खारकेचे बी काढून टाकून एकत्र वाटावे. नंतर 50 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम लोणी घालून मिश्रण रोग्याला खायला द्यावे. तसेच दिवसातून दोनतीन वेळा लिंबूपाणी दिल्याने यकृतपेशीचा नाश थांबतो. हिपॅटायटीसस ’बी’ हा एक गंभीर आजार असून तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करावेत. होमिओपॅथी बाराक्षार, निसर्गोपचार घेताना प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रकृतीमानानुसार तज्ञांकडून उपचार करून घ्यावेत.
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक – ९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८
कोणती टेस्ट केल्यावर आपल्याला हापितातीस बी झाला हे समजेल
HBSAG