समितीत एकी व्हावी म्हणून युवा शक्तीने पुढाकार घेऊन मध्यवर्ती समितीला अल्टीमेटम दिला असताना दुसरीकडे शहरातील गल्लो गल्लीतील पंच मंडळीनी देखील दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. कोरे गल्ली येथील गंगापुरी मठात शहापूर समितीच्या वतीने आयोजित सीमा सत्याग्रहींच्या नियोजित सत्कार समारंभास फक्त पंच मंडळीनी सक्रिय राहणार नसल्याचा इशारा दिला आहे.
शहापूर समितीच्या वतीने सीमा सत्याग्रहींचा सत्कार माजी नगरसेवक नेताजी जाधव आणि सहकाऱ्यांनी जाहीर केला आहे या कार्यक्रमास कोरे गल्ली येथील गंगापुरी मठ कार्यक्रमास ध्या अशी विनंती केली असता मठाचे सभागृह घ्या कार्यक्रम करा मात्र दोन्ही गटातील नेते जर मंचावर येत असतील तर कोरे गल्लीतील पंच सक्रिय असतील भविष्यात दोन्ही गटातील नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन कार्य करावे अशी भूमिका मांडली आहे.
माजी नगरसेवक नेताजी जाधव यांची एकीसाठी झटत असलेल्या युवकांनी भेट घेऊन मध्यवर्तीच्या सदस्यांना देखील आमंत्रण ध्या अशी मागणी केली होती त्यावेळी जाधव यांनी यावर आपला निर्णय कळवू अस आश्वासन दिले होते मात्र अध्याप दोन्ही गट एका व्यासपीठावर येण्याची चिन्ह दिसत नसल्याने एकीच्या लढ्यात कोरे गल्ली पंच मंडळीनी देखील सहभाग दर्शवला आहे.सगळ्या समित्या एकत्र आल्या पाहिजेत आणि नेते मंडळींनी या कार्यासाठी एकत्र यायला हवं ही देखील भूमिका त्यांनी मांडली आहे
शहर समिती पेक्षा एकीची गरज बेळगाव आणि खानापूर तालुका समितीत जास्त आहे त्यामुळे शहरा प्रमाणे तालुक्यात देखील एकी साठी प्रयत्न झाले पाहिजे अशी मागणी देखील होत आहे.कोरे गल्ली पंच शिवाजी हावळणाचे, बंडू मजुकर आणि मनोहर शहापुरकर यावेळी उपस्थित होते