बेळगाव मध्ये पासपोर्टचे कार्यालय सुरू करण्याला १४ फेब्रुवारी चा मुहूर्त मिळाला आहे. प्रेमाच्या दिनी एक चांगली सोय बेळगावला मिळणार आहे.
बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयात हे कार्यालय सुरू होणार आहे. १२ तारखेपर्यंत अर्जदारांना वेळ दिली जाणार असून १४ पासून दररोज ५० याप्रमाणे लोकांची भेट घेऊन पासपोर्ट मिळण्याची कामकाजे केली जाणार आहेत.
कडोली येथे साहित्य संमेलनास परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित होते. बेळगाव सिटीझन कौन्सिल च्या सदस्यांनी त्यांची खास भेट घेऊन अडलेल्या या कामाची समस्या मांडली होती, त्यावेळी १५ दिवस ते महिन्याच्या आत आपण हे कार्यालय सुरू करू असे आश्वासन त्यानी दिले होते, त्यांनी आपले आश्वासन पाळून एक कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी कसे काम करतो हेच सिद्ध केले आहे.१२ फेब्रुवारी पासून नवीन पासपोर्ट बनवणाऱ्याना वेळ दिला जाणार आहे सुरुवातीला दोन दिवस दररोज ५० तर त्या नंतर १०० जणांना पासपोर्ट बनवले जाणार आहे.
स्टेशन रोड वरील मुख्य पोस्टाच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय सुरू होणार आहे.