आगामी विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर बेळगाव पोलिसांनी गोवा आणि महाराष्ट्रातून बेळगाव कडे येणाऱ्या सर्व सीमा सील बंद केल्या आहेत. पोलीस आयुक्त डी सी राजप्पा आणि पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी या सीमांची पाहणी केली मिळालेल्या माहिती नुसार लवकरच महाराष्ट्र गोवा सीमेवर चेकपोस्ट बसवण्यात येणार आहे.
गुरुवारी सकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राकडून बेळगाव कडे येणाऱ्या सर्व सीमा पाहणी केली. निवडणुकीच्या अगोदर पासूनच सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.