हेल्मेट वापरा आणि जीव वाचवा असे सांगून दंड लावला तरी लोक शहाणे होत नाहीत यामुळे आता पोलीस गांधीगिरीवर उतरले आहेत. सोमवारी पोलीस आयुक्तांनी या गांधीवादी कारवाई सत्राला सुरुवात केली.
पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर आणि महानिंग नंदगावी हे रस्त्यावर उतरले आहेत.त्यांनी हेल्मेट नसणाऱ्यांच्या डोकीवर नवे हेल्मेट घालून त्याचे १०५० रुपये संबंधीत रहदारी पोलीस स्थानकात जमा करण्याची शिक्षा केली आहे.
या शिक्षेमुळे मिळेल त्या रंगाचे आणि किंमतीचे हेल्मेट घ्यावे लागत आहे. आता आवडते हेल्मेट हवे असल्यास लोकांनी ते पूर्वीच घ्यावे लागेल, नाहीतर पोलीस आयुक्त देतील तसले हेल्मेट घालून फिरावे लागणार आहे.