टिळकवाडी येथील एम व्ही हेरवाडकर शाळेच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे.
आशिष यु राजपूत वय 15 वर्षे रा.भवानीनगर टिळकवाडी असें या विध्यार्थ्याचे नाव आहे.एका कारणामुळे शाळेत प्राचार्यांनी आणि पालकांनी त्याला समज दिली होती त्या नाराजीतून त्याने गळफास लावून घेतले आहे का याचा तपास सुरू आहे.
शाळेत शिक्षक असोत किंवा घरी पालक विध्यार्थी घडवण्यासाठी समज दिली जातेच मात्र कोणत्याही स्थितीत ओरडले म्हणून आत्महत्या करणे चुकीचं आहे.विद्यार्थ्यांनी सर्व प्रकाराला सामोरे जायला हवं अश्या देखील प्रतिक्रिया मिळत आहेत