Friday, January 3, 2025

/

टेम्पोची दुचाकीला धडकेत युवक ठार

 belgaum

टेम्पोची दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास बागलकोट रोडवरील पोद्दार स्कूलजवळ हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश कृष्णा पाटील। ( वय 21 रा. मुतगा )असे मृताचे नाव आहे. राजेश उद्यमबागमध्ये कामाला होता. कामावरून तो होनगा येथील यात्रेसाठी गेला होता. तेथे जेवण करून तो रात्री बाराच्या सुमारास घरी परतला. पोद्दार स्कूलच्या पुढील बाजूस पुजारी कॉम्पलेक्स जवळ करडीगुद्दीहून येणाऱ्या 407 टेम्पोने राजेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये राजेश रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.