बेळगावचे सिव्हिल हॉस्पिटल १८५९ साली सुरू झाले. ५३७७ रुपये खर्चून हे हॉस्पिटल बांधण्यात आले. २५ रुग्णांना ऍडमिट करण्याची व्यवस्था त्यामध्ये होती.
बेळगाव शहर, जिल्हा आणि शेजारील जिल्ह्यातील रुग्णांसाठी हे एक आधार आहे. शस्त्रक्रिया, बालरोग चिकित्सा, प्रसूती, ई एन टी, त्वचारोग, मानस शास्त्र, दंत तसेच डोळे तपासणी आदी सोयी याठिकाणी आहेत.
सध्या बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ला जोडले गेले आहे.