Thursday, December 19, 2024

/

माजी आमदार प्रह्लाद रेमानी यांचं निधन

 belgaum

खानापूर भाजपचे माजी आमदार प्रह्लाद कल्लापा रेमानी वय ६५ यांचं सोमवारी सकाळी दहा वाजता दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या महिन्या भर त्यांच्या वर बंगळुरू येथे उपचार सुरु होते चार दिवसा पूर्वी त्यांना बेळगावातील के एल ई इस्पितळात हलवण्यात आले होते.

prahallad.remani.

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार त्यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी के एल ई इस्पितळात अखेरचा श्वास घेतला.खानापूर विधान सभा मतदार संघात भाजपच्या तिकिटावर २००९ ते २०१३ पर्यंत त्यांनी आमदारकी भूषवली होती. त्यांच्या पाश्च्यात तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार असून खानापूर तालुक्यातील त्यांचं मूळ गाव झाड नावगे येथे सायंकाळी पाच च्या दरम्यान अंतिम संस्कार केला जाणार आहे. खानापूर तालुक्यात भाजप बळकट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.