धामणे गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शहापूर ते धामणे मिरवणूक काढण्यात आली. यात शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशापुरी हे भगवा फेटा परिधान करून मोठ्या दिमाखात या मिरवणुकीत बंदोबस्तात सहभागी झाले होते. या मिरवणुकी दरम्यान अनेकांशी ते संवाद साधताना दिसत होते अनेकांची मतं जाणून घेण्यात त्यांना महत्त्वाच वाटत होत.
आजच जुने बेळगाव गणेश पेठ गल्लीत झालेल्या गणेश जयंतीच्या महाप्रसादावेळीही त्यांनी हजेरी लावली. कोणताही बडेजाव न करता रांगेत उभा राहून महाप्रसाद घेतला. केवळ महाप्रसाद घेऊन न थांबता स्वतः महाप्रसाद वाढण्यासाठीही वेळ दिला. त्यामुळं लोकांमध्ये या अधिकाऱ्याविषयीच प्रेम अधिकाधिक दुणावू लागलय.
जनसंपर्कामुळं अनेक गोष्टीवर मात करता येते हे त्यांनी चांगलच ओळखलय. अनेकांना धटिंग करण्यापेक्षा ‘या’ अधिकाऱ्या सारख पोलिसिंग इतर अधिकाऱ्यांनी केल्यास एक नव चित्र पहायला मिळेल. बेळगाव शहर आत्ता जातीय वितुष्टासाठी प्रसिध्द होऊ लागलय ही मोठी खेदाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर जावेद यांचे प्रयत्न निश्चितच सगळ्या भेदाभेदीवर रामबाण उपाय ठरतील यात शंका नाही .