Tuesday, May 7, 2024

/

 दादांनी सीमा वासीयांची माफी मागावी – धनंजय मुंढेचं ट्विट

 belgaum

बेळगावाती मंदिर उद्घाटन कार्यक्रमात कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महाराष्ट्रातून टीका सुरू झाली आहे. सीमाभागातील विविध संघटनांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर मंत्री पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

mudhe dhanu

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री आहेत. त्यांनी आज, गोकाकमधील एका मंदिराच्या उद् घाटन कार्यक्रमास हजेरी लावली होती. त्यात त्यांनी एक कन्नड गीत गायले असून, जन्मावे तर कर्नाटकमध्येच, असा त्या गाण्याचा अर्थ आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे.

 belgaum

ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणा-या चंद्रकांतदादा पाटील यांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.