म्हादई नदी कळसा भांडुरा पाणी वादात कन्नड लोकांना ‘हरामी’ असा उल्लेख करणारे गोव्याचे जलसंपदा मंत्री विनोद पालेकर यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या प्रकरणी खानापूर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .
कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेचे अध्यक्ष गुरुलिंगय्या पूजेर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद झाला आहे . गेल्या १३ जानेवारी रोजी गोवायचे मंत्री पालेकर यांनी कळसा भांडुरा प्रकल्पास भेट देऊन कन्नडिगा ना उद्देशून अपशब्द वापरले होते या घटने नंतर कर्नाटक गोवा पाणी तंटा आणखी वाढला आहे . अशांतता माजवण्याचा उद्देशाने सौहार्दता बिघडवण्यासाठी असले वक्तव्य पालेकर यांनी केला असल्याचा आरोप रयत संघटनेने केला आहे