17 जानेवारी 1956 साली बेळगाव सह सीमा भागात झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या आंदोलनातील हुतात्म्यांना एकीकरण समितीच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
बुधवारी सकाळी शहरातील हुतात्मा चौकात शहर एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना पुष्प चक्र वाहत श्रध्दांजली वाहिली. यावेळी रामदेव गल्ली खडे बाजार,गणपत गल्ली मारुती गल्ली अनसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड येथे फेरी काढण्यात आली.बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,रहेंगे तो महाराष्ट्र मे नहीं तो जेल मे, हुतात्मे अमर रहे अश्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला.
यावेळी समितीच्या वतीने दीपक दळवी,किरण ठाकूर,कोल्हापूर मराठा महा संघाचे वसंतराव मुळीक,शिव चरित्रकार इंद्रजित सावंत, महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर ,अड राम आपटे, मालोजी अष्टेकर आदिनी पुष्पचक्र वाहिले.बेळगाव शिव सेनेच्या वतीनं हुतात्मा महादेव बारीगडी यांची कन्या गंगव्वा बारीगडी यांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
बलिदान वाया जाऊ देणार नाही- महापौर
गेली ६३ वर्ष हा लढा अविरत चालू असून त्याग बलिदानाचा हा लढा आहे सीमा भागातील मराठी भाषकांचे बलिदान वायू जाऊ देऊ नका असे आवाहन महापौर संज्योत बांदेकर याची केलं
महाराष्ट्राने जण ठेवावी -मुळीक
या लढ्यात अनेकांचे संस्कार उध्वस्त झालेत अनेकांनी लाठ्या खाल्ल्यात संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात चौथी पिढी सक्रिय असून लढ्याची जाण महाराष्ट्रातील नेत्यांनी ठेवायला हवी बेळगावातील मराठी माणसाना सुप्रीम कोर्टात नक्कीच न्याय मिळेल असा आशावाद कोळपर मराठा समाजाचे वसंत राव मुळीक यांनी काढले
महाराष्ट्राचं नाणं खोटं- किरण ठाकूर
मराठी जनतेच्या मागे महाराष्ट्र नाही ही बेळगावकरांची व्यथा असून महाराष्ट्राचं नाणं खोटं आहे अशी खंत किरण ठाकूर यांनी व्यक्त केली सर्व खासदार आमदारांनी पंत प्रधानांकडे गेल्यास सिया वासियांना नक्कीच न्याय मिळेल मात्र महाराष्ट्राकडे इच्छा शक्तीचा अभाव आहे असा आरोप केला. कर्नाटक कडून बेळगावातील मराठी जनतेची घटनेच्या अधिकाराची पायमल्ली होत आहे अख्या राज्यकर्त्यांना देशात राहायचा अधिकार आहे का ? असं संतप्त सवाल देखील त्यांनी केला .
राजकीय इच्छाशक्ती अभावानेच बेळगाव कर्नाटकात-दळवी
संयुक्त महाराष्टरच्या लढ्या नंतर राजकीय इछा शक्ती कमी पडल्यानेच बेळगावचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहेगेली ६१ वर्ष एकही आशेचा किरण न दिसत सीमा वासीय मोठ्या जिद्दीने उभे राहत आहेत लोकशाही मार्गातून चाललेल्या या लढ्यास नक्कीच सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल असा विश्वास दीप दळवी यांनी व्यक्त केला