Monday, May 6, 2024

/

१८ ते २१ दरम्यान लोकमान्य रंगमंदिरात रंगणार एकांकिका

 belgaum

सहकार क्षेत्राबरोबरच शैक्षणिक आणि सांस्कृतिक वसा घेतलेल्या कॅपिटल वन या संस्थेने सालाबादप्रमाणे यावर्षीही भव्य मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या आहेत.बेळगावातील नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी दिनांक १८ जानेवारी ते २१ जानेवारी या दरम्यान कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे या स्पर्धा घेतल्या जाणार आहेतअशी माहिती पत्रकार परिषदेत कॅपिटल वन या संस्थेचे अध्यक्ष शिवाजी हंडे यांनी पत्रकारांना माहिती दिली.

capital one
मागील ७ वर्षांपासून संस्थेच्यावतीने ही स्पर्धा घेतली जात असून यंदाचे हे आठवे वर्ष असून यावर्षी स्पर्धेत बेळगावसह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील नाट्य कलाकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यावर्षी ४४ निवडक संघाना स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये खुल्या आंतरराज्य गटामध्ये ३४, आंतरराज्य शालेय गटामध्ये ७ तर बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गटामध्ये ४ संघानी स्पर्धेत भाग घेतला आहे.
१८ ते २१ जानेवारी या दरम्यान सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत वेगवेगळ्या विषयांचा परामर्श घेत दररोज १० एकांकिकेचे सादरीकरण केले जाणार आहे. स्पर्धा परीक्षक म्हणून मुंबईचे संभाजी सावंत, गोव्याचे देवीदास आमोणकर व सांगलीचे राजेंद्र पोळ यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहितीही शिवाजीराव हंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठीच कॅपिटल वन या संस्थेने एकांकिका स्पर्धेचा उपक्रम हाती घेतला आहे. ही एक सांस्कृतिक चळवळ आहे. या चळवळीला वाढता प्रतिसाद लाभत आहे, असेही शिवाजीराव हंडे यावेळी माहिती देताना म्हणाले.
पत्रकार परिषदेला हरिभाऊ जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, संजय पाटील, सुभाष सुंठणकर, रामकुमार जोशी, शामराव सुतार यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.