यूएस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स आणि नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमन यांच्यात आज एक समन्वय करार झाला आहे. ४० महिलांना उद्योग क्षेत्रात आणून त्यांचे सबलीकरण हा उद्देश आहे.
भारताचा आर्थिक विकास आणि महिलांना उद्योग हा प्रकल्प राबण्यात येणार आहे.
यूएस चेंबर च्या प्रिया पुराणिक, एन एफ आय डब्ल्यू च्या प्रमोदा हजारे , महापौर संज्योत बांदेकर, भ्रष्टाचार निर्मुलन परिवार चे अध्यक्ष सुजित मुळगुंद, मंगल नंदीहळ्ळी, जॉन सॅम्युअल जोसेफ हे उपस्थित होते.
या करारामुळे बेळगावातल्या महिलांचं उद्योग क्षेत्रात सबलीकरण होणार आहे. खास करून दक्षिण भारतातील ग्रामीण महिलांना घर बसल्या रोजगार मिळणार आहे. 40 हुन अधिक ग्रामीण महिलांच्या वेस्ट मटेरीयल पासून बनवलेली खेळणी, शो चे आयटम, क्रोकरी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाव देण्यासाठी या एम ओ युचा उपयोग होणार आहे.
लवकरच वेबसाईटवर महिलांकडून बनवलेले वस्तू घालणार असून त्यातून अमेरिकेत याची विक्री केली जाणार आहे अशी माहिती प्रमोदा हजारे यांनी बेळगाव live शी बोलताना दिली आहे.