म्हादई नदीचे कळसा भांडुरा कालव्याची पाहणी करण्यासाठी कुंणकुम्बी येथे आलेल्या गोव्याच्या मंत्र्याने कर्नाटका बद्दल अपशब्द वापरले आहेत. गोव्याचे जलसंपदा मंत्री विनोद पालेकर यांनी कळसा भांडुरा नाल्याची पाहणी केली होती त्यावेळी कर्नाटका बद्दल अपशब्द वापरले आहेत .
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हादई प्रश्नी कर्नाटक भाजप अध्यक्ष बी एस येडीयुराप्पा यांना लिहिलेलं पत्र म्हणजे सुप्रीम कोर्टाचे आदेश नव्हेत कर्नाटक सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहे म्हादई बाबत डर्टी पोलिटीक्स करत असल्याचे आरोप पालेकर यांनी केला आहे.
म्हादई नदी आमची आई आहे कर्नाटकात शेतकऱ्यांनी आंदोलन केल तर आमच काय अस प्रश्न उपस्थित करत कन्नड लोकां बद्दल अपशब्द उच्चारले आहेत. हे प्रकरण कोर्टात असतेवेळी कर्नाटकला पाणी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असही ते म्हणाले. कळसा नाल्याची पाहणी करायला कर्नाटक पोलीस बंदोबस्तात कशाला गेला असता अस विचारले असता कन्नड लोक … आहेत म्हणून पोलीस बंदोबस्तात आपण बेळगावला गेलो होतो अशी कबुली त्यांनी दिली आहे.
या प्रकरणी कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम बी पाटील उद्या बेळगावात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत त्या नंतर सर्व कळसा भांडुरा पाहणी देखील करणार आहेत .