मकर संक्राती निमित्य सामान्य माणूस आपल्या मित्र परिवार नातेवाईकाना तिळगुळ वाटप करून गोड बोलण्याचा संदेश देत असतो मात्र कुणी नातेवाईक नसलेली अनाथ मुलं कुणाला तिळगुळ वाटणार? नेमकं हेच हेरून शिवप्रेमी युवकांनी अनाथ मुलांच्या करवी ऊन पाऊस सोसत शहरातील रहदारी नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणी जाऊन तिळगुळ वाटप करण्याचा अनोखा उपक्रम केला आहे.
शहरातील गंगम्मा चिकुंबीमठ येथील अनाथ मुलांना घेऊन चननमा चौक आणि कोर्ट भागात कर्तव्य बजावणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना तिळगुळ वाटप करण्यास लावले. ट्रॅफिक पोलीस आणि अनाथ मुलं दोघानाही सण साजरा करून काही वेळ का असेना सुखद धक्का दिला .शिवप्रेमी युवक संतोष कणेरी,मेघन लंगरकांडे,सतीश गावडोजी सुधीर कालकुंद्रीकर आदी तर ट्रॅफिक पोलीस कर्मचारी गंगम्मा चिकुंबीमठ अनाथ आश्रमाचे मॅनेजर मुलं उपस्थित होते.