आगामी दोन महिन्यात प्रलंबित असलेल नवीन पासपोर्ट केंद्र सुरु होईल आणि पुन्हा एकदा बेळगाव यायला आवडेल अस ठोस आश्वासन परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिल आहे. रविवारी सकाळी ते बेळगावला आले असता सिटीजन कौन्सिल च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिल आहे.
प्रलंबित १५६ पासपोर्ट केंद्रापैकी बेळगावचे पासपोर्ट केंद्र अजून सुरु झालेलं नसून ते आगामी दोन महिन्यात सुरु करू अस ते म्हणाले. सिटीझन कौन्सिलने पास पोर्ट कार्यालय सुरु होई पर्यंत विदेश व्यवहार खात्याने बेळगावात पासपोर्ट मेळावा आयोजित करावा अशी देखील मागणी केली.यावेळी सतीश तेंडूलकर,शेवंतीलाल शाह,बसवराज जवळी आणि विकास कलघटगी उपस्थित होते.
३१ मार्च पर्यंत देशात २५१ नवीन पासपोर्ट केंद्र
मुळे यांनी देशात अधिकाधिक पासपोर्ट कार्यालये सुरु करण्याची मोहीम हाती घेतली आहे.केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांनी सोलापूर इंदूर,उदयपुर.सिलीगुडी या चार ठिकाणी पासपोर्ट कार्यालये सुरु करून करा अस म्हटल्यावर मी प्रत्येक जिल्ह्याला पासपोर्ट कार्यालय सुरु करू सांगितलं होते. आगामी ३१ मार्च २०१८ च्या आधी देशात २५१ नवी पासपोर्ट केंद्र सुरु करणारआहोत गेल्या सहा महिन्यात ५९ नवीन पास पोर्ट कार्यालये सुरु केली आहेत अस देखील ते म्हणाले.
पुढच्या दीड दोन वर्षात अस काम करत राहिलो तर जवळपास ५० की मी अंतरावर एक पासपोर्ट कार्यालय सुरु होईलपासपोर्ट काढताना कुणालाही त्रास होऊ नये हाच उद्देश्य आहे.पासपोर्ट काढणे हि श्रीमंताची विदेशात जाणाऱ्यांची सरकारी व्यापाऱ्यांची सरकारी अधिकाऱ्यांची मक्तेदारी होती आता ती संपुष्टात आली आहे कारण सामान्य माणसाला अस वाटतय की दुबईला जायला हव अस वाटत आहे अस देखील ते म्हणाले.