Sunday, June 16, 2024

/

तिढा सुटलेला नाही मात्र लढा बेळगावकरांनी जिंकलाय – ज्ञानेश्वर मुळे

 belgaum

बेळगावचा लढा भाषेच्या अस्मितेवर ७० वर्षा पेक्षा अधिक काळ टिकला जगात अश्या क्वचितच गोष्टी इतिहासात दिसून येतात म्हणून मराठी भाषिक अभिनंदनाला पात्र आहेत. तिढा सुटला नसला तरी लढा बेळगावकरांनी जिंकला आहे कारण जोपर्यंत मराठी भाषा साहित्य संस्कृतीची धग तुमच्या अंतकरणात आत्म्यात जिवंत आहे तो पर्यंत तुमचं मराठी प्रेम कोणीही काढून घेऊ शकत नाही कोणतीही सीमा इथे निर्माण होऊ शकत नाही असे स्पष्ट मत परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले.
रविवारी सकाळी बेळगाव तालुक्यातील कडोली इथल्या मराठी साहित्य संघ कडोली आयोजित ३३ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. उद्योजक सुधीर दरेकर यांनी दीपप्रज्वलन करून साहित्य संमेलनाचे उद्घाटन केल.महाराष्ट्र निवृत्त पणन संचालक डॉ सुभाष माने औरंगाबाद,सुमित पिंगट,उमेश अतिवाडकर ,प्रशांत हुंद्रे,नगरसेवक मोहन बेळगुंदकर,विजय रूटकुटे आदी उपस्थित होते. gyaneshwar muley
बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग आहे ते महाराष्ट्रा बाहेर आहे अस कधीच आम्ही मानल नाही. जगभर मला बेळगावची माणसे भेटतात म्हणून याला सीमा भाग एवजी असीम भाग म्हणाव अस वाटत.ज्यावेळी या भागातला मराठी भाषिक एखाधा मराठी भाषिक मुख्यमंत्री असेल,ज्या प्रमाणे कोकणातल्या सुमित्रा महाजन यांनी इंदोर मध्ये आपली ताई म्हणून छाप पाडवली स्पीकर म्हणून अतुलनीय काम केल त्याच प्रमाणे जगभर भाषा संस्कृतीत आपला प्रभाव वाढवणे आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणे हा सीमा प्रश्नावर एक तोडगा असू शकतो असे ते म्हणाले .
मराठी भाषा पाठ्य पुस्तकात शाळा कोलेजात असली पाहिजे ही साधी सीमा भागातील मराठी जणांची मागणी आहे ती मान्य का होत नाही यासाठी महात्मा गांधीजीनी सांगितल्या प्रमाणे चांगल शिक्षण घ्या आणि राजकारण्या मध्ये तुमचा प्रभाव वाढवा हे केल तर सर्व प्रकारच्या सीमा आणि बेड्या उखडून पडतील त्या दिशेने सगळ्यांनी काम करायला हव असा सल्ला त्यांनी दिला.kadoli sahity sammlen
भाषा नष्ट होतायेत-
सध्या भाषावरच संकट आले आहे कोणतीही भाषा नष्ट व्हायला तीन पिढ्या लागतात म्हणजे ७५ वर्षात नष्ट होऊ शकते त्यासाठी भाषा संवर्धन महत्वाचे आहे. भाषा या स्वताच्या अस्तित्वासाठी टाहो फोडत आहेत दर १४ दिवसाला पृथ्वी वरील एक बोली भाषात जगात नष्ट होत आहे, मोठे मासे लहान माश्यांना खातात तसे इंग्लिश भाषा सर्वात मोठा शोर्क म्हणून जन्माला आलेली आहे सर्व लहान भाषाना,गिळंकृत करत आहेत इंग्लिशच्या तिच्या दाढेत आपण अडकलेलो आहेत यासाठी आपल अंगीकृत होऊ अस्तित्व टिकवू हे महत्वाचे आहे.
जगात १७ भाषा १७ लिपी असलेला एकमेव देश भारत आहे साहित्य अकादमी मोठी संस्था आहे य संस्थेत २४ भाषेत पुस्तक प्रकाशित होतात एक समुद्ध वारसा तो टिकवायला हवा.लोककला संस्कृती यातून भाषा टिकून राहते.
भाषामुळे रोजगार वाढतो
पंतप्रधान विदेशात जातात द्विपाक्षित चर्चा करतात तेंव्हा ते केवळ हिंदीतून बोलतात. भारतीय भाषेतून बोलल्यास नवीन नोकऱ्या निर्माण होतात अनुवादक म्हणून नोकऱ्या तयार होतात.सगळे मराठीत बोलातायला लागा सगळा भारत देश आपापल्या भाषेत बोलायला लागेल तेंव्हा ज्या इंग्लिश कंपन्या आहेत भारतात येणाऱ्या तुमच्या भाषेत नोकऱ्या तयार कराव्या लागतील हे चक्र उलट फिरवण्याची गरज आहे जर चक्र उलट फिरवल नाही तर याच चक्रात आम्ही फसणार आहोत रसवंती ग्र्हत्ल चिपाड सारखी अवस्था होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.