कित्तूर पासून वीस किमी अंतरावर असलेल्या उप्पीन बेटगीरी इथे गावठी औषध आणण्यासाठी गेलेला क्रूझर इटगी क्रॉस नजीक पलटून झालेल्या अपघातात १ ठार तर सतरा जखमी झाले.
शनिवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. बळीराम पाटील( वय ६५) रा लोकोळी असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचार करत असताना तो दगावला तर इतरांवर उपचार सुरू आहेत.