Friday, April 26, 2024

/

बेळगावात अनंतकुमार हेगडेना दाखवल्या काळ्या फिती

 belgaum

केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांना काळी निशाण दाखवून विरोध करण्यात आला आहे.सोमवारी सकाळी विविध दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी हेगडे यांना काळी फित दाखवून निषेध केला.

DAlit
सोमवारी दुपारी चन्नमा चौकातील कन्नड साहित्य भवनात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी होण्यास आले होते.त्यावेळी हेगडे चन्नमा चौकात येताच विविध दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हेगडे यांचा काळी निशाणे दाखवत घोषणाबाजी करत विरोध केला.
विविध विरोधी वक्तव्यांनी अनंतकुमार हेगडे सध्या वादास कारण ठरत असून त्यांना सर्व थरातून विरोध होत आहे. बेळगावातही त्यांना दलित कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे, पक्षाने त्यांना आवरावे अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे काही खरे नाही असेच दलित समुदाय सांगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.