- आजची राशी ” तूळ”
(राशीस्वामी- शुक्र)
|| नवीन दिशा दाखवणारे वर्ष|
राशी वैशिष्ट्ये
तूळ ही कालपुरुष कुंडलीतील सातव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीचे स्वामित्व पश्चिमेला असते. या राशीचे लोक दिसण्यात आकर्षक असतात. शास्त्र, कला, सौन्दर्य, याची आवड असणाऱ्या असतात. हुशार, बुद्धिमान, समतोल वृत्तीच्या असतात. शांत, न्यायप्रिय, महत्वाकांक्षी, सत्वगुणी तसेच तडजोड करण्याची वृत्ती असते.
स्वभाव वैशिष्ट्ये
आपल्या मोहक व गोड वागणुकीने ते सर्वांना आपलेसे करून घेतात. तसेच निश्चयी स्वभाव असतो. आपले मत ही माणसे कधीच बदलत नाहीत. निर्णयावर ठाम असतात, सगळ्या बाबतीत समतोल पणा राखणे, योग्य न्याय देणे उत्तम जमते. या राशीचे लोक उत्तम न्यायाधीश असू शकतात.
या राशीचे लोक विशेष करून सौन्दर्य कारक वस्तूंच्या व्यापारात दिसून येतात. सुगंधी वस्तूचे व्यापार, उदबत्त्या, कॉस्मेटिक्स, वस्त्र व्यवसाय, रंगकाम, रंगीत छपाई, प्रिंटिंगची कामे यात आढळतात. या राशीच्या स्त्रिया देखण्या, मोहक सौन्दर्याच्या आणि टापटीप असतात. विणकाम, भरतकाम, कला, वाद्य हा त्यांचा मुख्य छंद असतो. यात त्या प्रवीण असतात, रांगोळी रेखाटने, चित्र काढणे यात निपुण असतात. राजकारण, कला क्षेत्रातही या राशीच्या व्यक्ती उत्तम कामगिरी पार पाडतात.
पोटाच्या आतड्यांना सूज येणे, मूत्रपिंडाचे विकार, स्त्रियांना गर्भाशयाची दुखणी किंवा त्यासंबंधी आजार उद्भवतात.
वार्षिक ग्रहमान
तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष मागील वर्षापेक्षा अनुकूल फळे देईल. आत्ताच शनीच्या साडेसाती मधून आपण बाहेर आला, आता शनी आपल्या राशीच्या तृतीय स्थानात आला आहे. या स्थानी शनी शूरत्व व धीटपणा देतो, बलवान होतो, त्यामुळे
जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात व्यापारी वर्गाची कमाई चांगली होईल, नवीन योजना कार्यरत होतील, ट्रान्सपोर्ट च्या व्यवसायात असणाऱ्यांना फायदा होईल, तसेच छोटे प्रवासी व्यवसाय करणाऱ्यांची चांदी होईल, परंतु या स्थानातील शनी भावंडाबद्दल गैरसमज निर्माण करतो. भावनदाबरोबरच शेजारी आणि नातेवाईकांचे संबंध बिघडण्याची शक्यता असते, यास्थानात असणारा शनी कानाची दुखणी देतो याठिकाणी बुद्ध व प्लूटो शनीसोबत असल्याने लेखन कार्यात असणाऱ्यांना लाभ होईल, प्लुटोमुळे अचानक एकाधी विचित्र गोष्ट घडून येईल.
मार्च व एप्रिल हा काळ तास मद्यमच राहील, वर्षाच्या सुरुवातीलाच गुरू आपल्या राशीत लग्नी येत असल्याने स्त्रियांना याकाळात अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करता येईल. वकील, प्राध्यापक, लेखक यांना हा काळ विशेष अनुकूल राहील. विध्यार्थी वर्गाला हा काळ अनुकूल राहील, अभ्यासाकडे विशेष लक्ष्य दिल्यास यशाची उंच भरारी घ्याल. मधुमेह असणाऱ्यांनी काळजी घ्याल, लग्नातील गुरू रक्तातले दोष वाढवतो तसेच स्थूलता वाढवतो, व्यापार धंद्यात समतोल राहील, नोकराकडून सहकार्य मिळेल, कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल, विध्यार्थ्यांना कलेत यश मिळेल.
मे व जुन याकाळात आपणास थोडे मानसिक त्रास होतील कारण याकाळात घरातील वातावरण गरम राहील. घरात काही कारणाने वादाचे प्रसंग निर्माण होतील. कौटुंबिक अडचणी, आईशी वादाचे प्रसंग, स्थावर इस्टेटीचे व्यवहार बिघडणे, कुटुंबातील प्रिय व्यक्तींचा वियोग आदी प्रसंग दर्शवितात.
खरेदी विक्री, व्यापारात घोटाळे होणे, कोर्ट कचेरी फेऱ्या घालाव्या लागतात, स्त्रियांना या स्थानातील योग कौटुंबिक जाच सोसायला लावतो, त्यामुळे नवपरिणितांनी गृही संयमाने राहावे, याकाळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
जुलै, ऑगस्ट याकाळात सावधपणे वागावे. वर्षाच्या सुरुवातीला ३१ जानेवारीचे तसेच २७ जुलै चे चंद्र ग्रहण आपल्या राशीला अशुभ फलदायी आहेत. प्रकृतीच्या तक्रारी वाढतात. विवाह सारखे प्रसंग जमवताना अडथळे निर्माण होतील. वैवाहिक जीवनात घटस्फोटाचे प्रसंग आणतो यामुळे वैवाहिक सुखाचा अभाव याकाळात होईल. तसेच भागीदारी व्यापारात चढ उतार होईल. एकादे आर्थिक नुकसान होऊ शकते.
विध्यार्थीवर्गास हा काळ चांगला जाईल. शिक्षणासाठी प्रदेश गमनाचे योग येतील, यशदायी असा काळ आहे, स्त्रियांनी कुटुंबात वादाचे प्रसंग येणार नाहीत याची काळजी घ्यावी, वयस्कर मंडळींना आपल्या स्नेहीच्या भेटी होतील याचे समाधान लाभेल.
सप्टेंबर , ऑक्टोबर हा विवाहयोग्य तरुण तरुणींना प्रेमात यश देणारा काळ आहे. ज्यांचा विवाह झाला नाही त्यांचा विवाह जमेल. गुरू आपल्या राशीतून जाता जाता शुभफळे देऊन जाईल, ऑक्टोबर च्या पूर्वार्धात गुरू वृश्चिक राशीत प्रवेश करेल, याकाळात कुटुंबात आनंदी वातावरण राहील, पाहुण्यांचे आगमन होईल, सहलीचा आनंद उपभोगाल, व्यापारी वर्गाला याकाळात आर्थिक लाभ होतील, कापड उद्योगात असणाऱ्यांना विशेष लाभ होतील. कुटुंबात असणाऱ्या स्त्रियांचे मन कुटुंबात चांगले रमेल, गृहसौख्याच्या दृष्टीने हा महिना अतिउत्तम असा राहील, स्त्रियांना दागिन्यांची होऊस पुरवता येईल, मात्र भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन व्यवसाय सुरू करताना काही भागीदारी करताना काळजी घ्यावी, आर्थिक फटका बसू शकेल. स्त्रियांचे देवधर्म व कुळाचारात मन रमेल.
नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वर्ष सरता सरता आपल्याला नवीन दिशा मिळेल. वर्षाचे अखेरचे दोन महिने आपणास मध्यम फलप्रद राहतील, काही नवीन गोष्टींची सुरुवात होईल, तरुण तरुणींना नवीन संसारात रममाण होता येईल. विध्यार्थी वर्ग काही नवीन करण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतील. त्यादृष्टीने त्यांना संधी उपलब्ध होईल. त्यांना आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल. घरात मंगल कार्ये घडतील, विवाहित व्यक्तींना संतान प्राप्तीचे योग येतील.
नोकरीत असणाऱ्यांना नवीन ठिकाणी काम करण्याची संधी प्राप्त होईल, त्यांनी वरिष्ठांशी संभाळून घ्यावे, ते आपल्या कामावर नाराज होऊ नयेत याची काळजी घ्यावी, याकाळात होणारे सण उत्सव आपल्या कुटुंबासमवेत आनंदाने साजरे कराल# तूळ राशीतील नक्षत्रे: चित्रा, स्वाती, विशाखा
#चित्रा स्वभाव : साहसी, बलवान नाम अक्षर : रा, री
# स्वाती स्वभाव : साहित्य प्रेमी, सात्विक नाम अक्षर : रु,रे,रो,ता
#विशाखा स्वभाव : चर्तुर , भोगवादी नाम अक्षर: ती,तू,ते
उपासना
# चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी फुटानेसाखर कुमारिकेला देणे. सरस्वती स्तोत्राचा पाठ करावा.
# स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी काळ्या चण्याची उसळ शनिवारी दान करावे. शनिस्तुती वाचावी.
# विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी खणा नारळाच्या ओटी भरून सवाष्ण जेवू घालावी. सप्त शनीचे पाठ वाचावे.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे हिरा
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
# शुभवार : गुरुवार, शुक्रवार
# शुभमहिने : जानेवारी, फेब्रुवारी, जुलै
#रंग : गुलाबी, आकाशी, चॉकलेटी
( भाग्योदय वयाच्या २४ ते ४२ या काळात होईल)