तालुका समितीच्या युवा आघाडीच्या बैठकीत सीमा प्रश्न आणि संघटना बळकटी पेक्षा जेवणावळी मांसाहारी करायची की शाकाहारी यावरच अधिक चर्चा रंगली होती.आगामी 12 जानेवारीला बेनकनहळळी येथे युवा मेळाव्याच आयोजन करण्यात येणार आहे त्या पाश्वभूमीवर युवा आघाडीची महत्वपूर्ण बैठक समिती कार्यालयात झाली.
निवडणुकी पूर्वी संघटना बळकट करणे सर्व समावेशक भूमिका घेणे सीमा प्रश्नी जनजागृती करणे या गोष्टीना फाटा देत केवळ जेवणावळ चा मेनू कसा असेल यावरच चर्चा झाली.बेळगावातील मराठी जनावर होणाऱ्या अन्यायाचे आवाज उचलत, सत्य भूमिका मांडणाऱ्या बेळगाव live वर देखील जहरी टीका करून वायफळ चर्चा करण्यात आली. एका माजी तालुका पंचायत सदस्याने बेळगाव live चा निषेध करा सूर आवळला मात्र त्याला काही जेष्ठ कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला.
एकेकाळी चिरमुरे वर लढे मेळावे व्हायचे त्यामुळे आगामी मेळाव्यात देखील मटणाच्या ऐवजी चिरमुरे आईस्क्रीम किंवा शाकाहारी जेवण करा अशी मागणीही काही कार्यकर्त्यांनी केली मात्र शेवटी नॉन व्हेज चाच बेत आखण्यात आला आहे. सीमा प्रश्नी युवकांची जनजागृती करण्यापेक्षा जनतेला अंधारात ठेऊन हेकेखोर नेत्याची नकळत उमेदवारी जाहीर करण्याचा आटापिटा हाच ‘त्या मेळाव्याचा’ उद्देश्य आहे का हा संशय येऊ लागला आहे.