उधमबाग पोलीस स्थानकाच्या बाजूलाच असलेल्या एक फॅक्टरीत आगीच्या शेकोटीत जळून सिक्युरिटी चा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना उद्यमबाग परिसरात खळबळ माजवून गेली आहे.
या प्रकरणी समजलेल्या अधिक माहिती नुसार रविवारी रात्री आगीच्या शेकोटीत पडून या सेक्युरिटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने रात्रीच जळलेला मृतदेह कुत्र्यांनी लचके मारला असल्याचा प्रकार घडला आहे.या फॅक्टरीचा गेट बंद असल्याने तिथे कुणीच गेलं नाही सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
उध्यमबाग पोलीस निरीक्षक निरंजन पाटील यांनी बेळगाव live ला दिलेल्या माहितीनुसार या सेक्युरिटी कर्मचाऱ्याच नाव प्रभाकर वसंत पुकळेकर वय 65 वर्ष रा.झटपट कॉलनी अनगोळ असे आहे.पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून सेक्युरिटी चा शेकोटीत तोल जाऊन घडली किंवा आणखी काय प्रकार आहे याचा तपास सुरू आहे