बेळगाव शहर आणि परिसरात कोणत्याही स्थितीत भाजपचे जास्त उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ नव्हेत असे गणित सध्या काँग्रेस पक्ष राबवत आहे. प्रत्येक मतदार संघात असेच गणित वापरून आपले उमेदवार पडले तरी चालतील मात्र भाजप निवडून येऊ नये याची खटपट काँग्रेसी नेते करत आहेत.
बेळगाव ग्रामीण भागात काँग्रेसने समिती नेत्यांना मॅनेज करून आपल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुढे केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काही फरक पडला नाही पण यावेळी बेळगाव मतदारसंघात खासदारकीला उभ्या राहून पडल्यावर हेब्बाळकर यांनी सम्पूर्ण मतदार संघात पैसे पाण्यासारखे वाटले आहेत. समितीचा उमेदवार कोण झाला तर आपण निवडून येऊ शकतो ते त्यांनी ठरवून टाकले आहे, स्वतःचा विजय आणि भाजपचा पाडाव यासाठी त्यांनी बरेचसे मॅनेजमेंट सुरू केले असून त्यात त्या कितपत यशस्वी ठरतील हे पहावे लागेल. जारकीहोळी ब्रदर्स पैकी एकाला मॅनेज करण्यात मात्र त्या अपयशी ठरत असून तेच त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे
बेळगाव उत्तर मध्ये विध्यमान आमदार फिरोज शेठ यांनी आपल्या दोनवेळच्या आमदारकीत बरीचशी व्होट बँक जमवली आहे. भाजपचा उमेदवार एक गठ्ठा हिंदू मते घेण्यात यशस्वी झाला तर मुस्लिम मतांच्या जोरावर पुन्हा विजयाची हॅट ट्रिक करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. समितीने बलाढ्य उमेदवार दिल्यास मराठी मतांच्या जोरावर निभाव लागू शकतो हे त्यांना माहीत असल्याने काही मराठी भाषिकांनाही त्यांनी जवळ केले असून त्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जात आहेत. एम आय एम या पक्षानेही आपला उमेदवार देऊन मुस्लिम भाषिकांची मते फोडल्यास मात्र शेठ यांना जड जाऊ शकते.
बेळगाव दक्षिण मध्ये काँग्रेसकडे चेहरा नव्हता, यामुळे बहुसंख्य विणकर मते घेऊ शकतील असे एम डी लक्ष्मीनारायण यांचे नाव पुढे आणण्यात आले आहे. भाजप याच मतांचा वापर पूर्वी करत होता , आताही भाजपात विणकर उमेदवार देण्यावरून भाजपात हालचाली सुरू आहेत, हे राजकारण ओळखून काँग्रेसने आपला पत्ता फेकला आहे, त्यात पक्षातीलच जारकीहोळी समर्थक विरोधात थांबले असून नेमके काय होते हे पाहावे लागणार आहे.
यापूर्वी काँग्रेसने कट्टर मराठी म्हणून संभाजी पाटील तर कट्टर कन्नड उमेदवार अनिल पोतदार यांना तिकीट दिले होते, मात्र २२ ते २७ हजारापेक्षा पुढे त्यांची मजल जाऊ शकली नव्हती, आता विणकर कार्ड चे काय होणार ? याची चर्चा सुरू आहे.