Saturday, April 27, 2024

/

ओझे उचलणाऱ्यां सोबत नवीन वर्ष साजरा करण्याचा सिटीजन कौन्सिलचा उपक्रम 

 belgaum
३१ डिसेंबर नवीन वर्षाच्या निमित्ताने  कित्येक जण पार्टी करून पैसा वायफळ खर्च करत असतात तोच पैसा  आणि ऊर्जा योग्य  ठिकाणी खर्च केल्यास देशहित आहे. हे ओळखत   अश्याच कष्टकरी  प्रवाश्यांचे ओझे उचलणाऱ्या सोबत नवीन वर्ष साजर करण्याचा उपक्रम सिटीजन कौन्सिल च्या सदस्यांनी केला आहे.
बेळगाव  रेल्वे स्थानकावर सकाळी सहाच्या पहिल्या पॅसेंजर गाडी पासून रात्री दीड वाजताच्या निझामुद्दीन एक्सप्रेस च्या प्रवाश्यांचे ओझे वाहणाऱ्या कुलींचा सत्कार करत नवीन वर्ष साजर केलं आहे. देवकुमार मुचंडी वय ७५ ,गणेश देशपांडे वय ४८,दस्तगीर सनदी यावं ४४ यांना ब्लॅंकेट पुष्पगुच्छ देत त्यांच्या सोबत बसून मिठाई खात एक आगळा वेगळं असं नवी वर्षाचं स्वागत केलं आहे. सिटीजन कौन्सिलचे सतीश तेंडुलकर, सेवंतीलाल शाह, अरुण कुलकर्णी सह स्टेशन मास्टर एस सुरेश यावेळी उपस्थित होते.
citizen council
पहाटे लवकर उठून आपलं काम करणाऱ्या ५० वर्षा हुन अधिक सेवा बजावणारे कुलीं वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन दिवस सारखाच असतो कारण राबणाऱ्या च्या नवीन वर्षात काहीसा बदल होईल असं शक्यता कमीच असते. स्वाभिमानाने प्रामाणिक पाने हमाली करणाऱ्या कुली मध्ये असलेली जिद्द आजच्या युवकांनी घ्यायला हरकत नाही असे मत सतीश तेंडुलकर यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी आपल्या आयुष्यात प्रवाशांचे ओझे उचलणाऱ्या कुलींनी सामान बॅग उचलत पैशांच्या बॅग देखील आपण प्रामाणिक पणे परत केले असल्याचे अनुभव सांगितले . सिटीजन कौन्सिलचा उपक्रम पाहून रेल्वे स्थानकावर जमलेल्या अनेकांनी देखील कुलींचा सत्कार केला
 प्रबळ इच्छा शक्ती मेहनत करणारी व्यक्ती जगातील कोणतेही काम करू शकते आपल्या कार्यातून देश हिताला हातभार लावू शकते आपल्या आयुष्यातील ५० वर्ष कुळी काम करणारे कामगार यास यास  नाहीत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.