Monday, December 23, 2024

/

वणव्याने पेट घेतलाच … दोन मराठ्यांना संधी मिळण्याची शक्यता?

 belgaum
भाजपच तिकीट कुणाला हाच लाख मोलाचा प्रश्न सध्या मोदी भक्तांना भाजप समर्थकांना  सतावत आहे कारण अध्याप कुणाचेच तिकीट कन्फर्म नसल्याने पक्षात संभ्रमावस्था आहे. जस जस विधानसभा जवळ येत आहे तस तशी तिकीट कुणाला अनेक वेगवेगळी राजकीय समीकरण वेगळी होऊ लागली आहेत.
भाजपचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शाह यांची सर्व्हे टीमन तीन वेळा बेळगावचा दौरा केला असून पक्ष हाय कमांड ला रिपोर्ट दिला आहे. बेळगावात मराठी भाषिकांचे प्राबल्य पाहता हळूहळू सर्वच राजकीय पक्ष त्यातल्या त्यात भाजपने मराठा समाजाच्या दोन उमेदवारांना यावेळेस तिकीट देण्याची तयारी चालवली आहे मराठ्यांना बाजूला केल्यास पक्षाला नुकसान होण्याची शक्यता असल्याने भाजप हाय कमांड गंभीर विचार करत आहे.

flame

सुत्रा कडून मिळालेल्या माहिती नुसार कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बेळगाव उत्तर मधून सेठ यांचा पराभव करण्यासमोठी रणनीती आखली आहे.हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळवून उत्तर मतदार संघ कॉंग्रेस मुक्त करण्यासाठी ग्रामीण आमदार संजय पाटील यांना उत्तर मधून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत हाय कमांडने चालविले आहेत. तर बेळगाव दक्षिण आणि ग्रामीण मधून दोन मराठी भाषिक मराठा समाजातील नेत्यांना उमेदवारी देणार असल्याचे देखील बोललं जात आहे.
उत्तर दक्षिण ग्रामीण पैकी एक जैन एक मराठा एक लिंगायत अथवा दोन मराठी भाषिकांना संधी दिली जाऊ शकते. वेगवेगळ्या प्रकाराचे दोन तीन फोर्मुले अमित शाह टीमने सर्व राजकीय घडामोडींचा अभ्यास करत केले असून वरील पैकीकोणता प्लान राबवायचा याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.दक्षिण मतदार संघात कॉंग्रेसने एम डी लक्षी नारायणना संधी दिली तर भाजप मराठा समाजाला उमेदवारी देणार याची देखील चर्चा केली जात आहे.अनेक फोर्मुल्या प्रमाणे दक्षिणेत विणकर मतदारांचे प्राबल्य असल्याने मराठी भाषिकांशी सख्य असलेला विणकर समाजाचा उमेदवार देण्याचाही विचार सुरु आहे.
मागील विधानसभेत उत्तर मधून पराभूत झालेले सध्या संघ परिवाराचे उमेदवार म्हणून परिचित असलेले,दक्षिणेत मराठा मतदारांची अधिक संख्या पाहता मराठा कोट्यातून किरण जाधव यांना बेळगाव दक्षिण मधून तर ग्रामीण मधून एका प्रबळ मराठा उमेदवारास तिकीट मिळू शकते यावर देखील पार्टी हाय कमांड चर्चा करत आहे.
त्या माजीची लोकसभेवर वर्णी शक्यता
दक्षिण मतदार संघातील माजी आमदाराचा पत्ता कट मानला जात असून त्याना विद्यमान खासदारास बगल देऊन लोकसभेला उमेदवारी देऊन असे आश्वासन  हाय कमांड तर्फे दिले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.